फक्त 4 भागांच्या या सीरिजने धुरंधर 2 ला टाकले मागे, बनली OTT वर नंबर 1, कथा प्रचंड सुपरहिट
प्रेम, धोका आणि बदल्याची कथा सांगणारी चार भागांच्या या सीरिजने ओटीटीवर मिळवला कब्जा, गेल्या अनेक दिवसांपासून पहिल्या नंबरवर असणाऱ्या धुरंधर 2 ला टाकले मागे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली रोमँटिक-थ्रिलर वेब सीरिज ठुकरा के मेरा प्यार 2 सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अवघ्या 4 भागांच्या या नव्या सीझनने ट्रेंडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले असून, याआधी नंबर 1 वर असलेल्या 'धुरंधर 2' लाही मागे टाकले आहे.

या मालिकेचा पहिला सीझन 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेम, फसवणूक, राजकारण आणि सूड या भावनांभोवती फिरणाऱ्या कथेमुळे त्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास दीड वर्षानंतर आलेला दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

दुसऱ्या सीझनची कथा पहिल्या सीझनमधील नाट्यमय घटनांनंतर सुरू होते. पहिल्या भागात शानविका चौहान (संचिता बसू) हिने कुलदीप कुमार (धवन ठाकूर) याचा अपमान करून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. नव्या सीझनमध्ये कुलदीप आपल्या जुन्या चुका सुधारण्याचा आणि त्याचे प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

बदललेले सत्तासमीकरण, भावनिक संघर्ष आणि सूडाची भावना यामुळे कथा अधिक रंजक बनली आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर पाहता येते. ट्रेंडिंग यादीत तिने Laughter Chefs, Drishyam, Junior आणि Jolly LLB 2 यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांना मागे टाकले आहे.

या मालिकेत संचिता बसू, धवन ठाकूर, अनिरुद्ध दवे आणि सुशील पांडे हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. मालिकेला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाल्याचे सांगितले जाते. रोमँटिक ड्रामा आणि थ्रिलर प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मालिका एक चांगला पर्याय मानली जात आहे.