Raqesh Bapat-Tejashri Pradhan: राकेश बापट-तेजश्री प्रधानच्या लग्नाची चर्चा, आईला थेट नातेवाईकांचे फोन, बहिणीने सांगितलं सत्य

Raqesh Bapat-Tejashri Pradhan: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, राकेशच्या बहिणीने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

| Updated on: May 13, 2026 | 7:22 PM
1 / 6
अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून बाहेर आल्यानंतर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात त्याने आपल्या पहिल्या पत्नीसोबतच्या (रिद्धी डोगरा) घटस्फोटावर भाष्य केले होते. मात्र, तो घराच्या आत असताना बाहेर अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत त्याच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता.

2 / 6
या प्रकरणावर राकेशची बहीण शीतल बापट हिने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय घडलं, यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

3 / 6
तेजश्री आणि राकेशच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. या बातम्या वाचून राकेशच्या आईला त्यांच्या नातेवाईकांचे सतत फोन येऊ लागले होते, ज्यामुळे कुटुंबात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

4 / 6
राकेशची बहिण शीतलने सांगितले की, त्यांना स्वतःला या लग्नाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. ही बातमी जेव्हा त्यांनी थेट मीडियामध्ये वाचली, तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला.

5 / 6
राकेश आणि तेजश्रीच्या लग्नाच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून त्या केवळ अफवा असल्याचे शीतलच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.

6 / 6
राकेश बापट बिग बॉसच्या घरात आपल्या खेळासाठी चर्चेत राहिला असला, तरी बाहेर त्याच्या लग्नाच्या या चुकीच्या बातम्यांमुळे त्याच्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us