
आज प्रत्येकजण सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतो. सचिनने अनेक विक्रम केले आहेत. तर आज याच क्रिकेटचा देव असलेल्या सचिनने दसऱ्यानिमित्त त्याच्या खास बॅट आणि बॉलची देवाप्रमाणे पूजा केली आहे.

सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने दसऱ्यानिमित्त त्याच्या घरात पूजा केली आहे. या पूजेचे फोटो त्याने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सचिनच्या घरातील मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती दिसत आहेत. तर सचिन मंदिरात देवी-देवतांची आणि त्याच्या बॅट-बॉलची पूजा करताना दिसत आहे.

सचिनने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आई सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये सचिन त्याच्या आईच्या पाया पडताना, आशीर्वाद घेताना दिसत आहे. हे खास फोटो शेअर करत सचिनने त्याच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याच्या बॅटची आणि बॉलची पूजा करताना दिसत आहे. सचिनने त्याच्या घरातील मंदिरात देवांसोबत बॅट आणि बॉलही ठेवला आहे. तसंच तो या फोटोमध्ये देवासमोर आणि बॅट-बॉल समोर बसून प्रार्थना करताना दिसत आहे.

सचिनने चाहत्यांना शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विजय दशमी साजरी करणाऱ्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ज्याप्रमाणे बॉल सीमा ओलांडतो त्याप्रमाणेच वाईटावर चांगल्याचा विजय तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करू शकेल. त्यामुळे सर्वांनी सदैव आनंदित रहा.