सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागला, पर्यटकांची होऊ लागली गर्दी

सातारामधील पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) पर्यटकांसाठी आकर्षण असतो. यावर्षी मे आणि जून महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हा धबधबा वाहू लागला. पर्यटकांची पावले उलटा धबधबा पाहण्यासाठी सडावाघापूर येथे वळत आहेत. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

| Updated on: Jun 24, 2025 | 10:36 AM
1 / 5
यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. सडावाघापूर येथील उलटा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. सातारा जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुणे, मुंबईवरुनही पर्यटक निसर्गाचा अविष्कार पाहून मंत्रमुग्ध होत आहेत.

2 / 5
तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा आहे. दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापूर पठारावर असलेला हा धबधबा वाहू लागतो. परंतु यंदा जून महिन्यातच धबधबा वाहू लागला आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडत आहे.

3 / 5
पठारावर संततधार पाऊस व जोरदार वारे असतात. यामुळे अनेक ठिकाणी पठारावरुन खाली वाहणारे पाणी वाऱ्यांच्या वेगामुळे उलट वाहते. त्यामुळे या ठिकाणी उलटा धबधब्याची परिस्थिती तयार होते. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा दृश्य या ठिकाणी दिसते.

4 / 5
सडावाघापूर पठारावर निसर्गाच्या विविध रंगांची उधळण दिसते. पिवळी, पांढरी, निळी, गुलाबी, लाल रंगांनी पठार व्यापले जाते. उलट्या धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सडावाघापूर पठाराचे या रानफुलांमुळे चर्चेत असते.

5 / 5
पठारावर येणाऱ्या बेशिस्त वाहनधारक आणि हुल्लडबाज पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र भोरे यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. वाहन धारकांची तपासणी केली जात आहे.