
हार्दिक पंड्या, विराट कोहलीनंतर क्रिकेटपटू झहीर खानही लवकरच बाबा होणार आहे.

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्याकडेही ‘गुड न्युज’ असल्याचे वृत्तसमोर येते आहे.

दोघांच्या जवळच्या व्यक्तींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, अद्याप झहीर आणि सागरिकाने यावर मौन बाळगले आहे.

अलीकडेच झहीर खानने त्याचा 42वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने सागरिकाने त्याला खास शुभेच्छा दिल्या होत्या.

क्रिकेटच्याबरोबरीने झहीरचे पर्सनल आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. झहीरने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत २०१७मध्ये लग्नगाठ बांधली.

काही कॉमन फ्रेंड्समुळे सागरिका आणि झहीर खान यांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. जवळपास दीड-दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

क्रिकेट आणि अभिनय दोन्हीही जगतात त्यांना एक ‘आदर्श जोडी’ म्हणून ओळखले जाते.