आपण त्याच्या अनुपस्थितीत काय करतो, हेच… अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली खरं प्रेम नक्की काय असंत? जुना व्हिडीओ व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काही काळापूर्वी दिलेला एक इंटरव्युह सध्या चर्चेत आला आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सईने नुकतेच प्रेमाबद्दल आपले विचार मांडले. खऱ्या प्रेमाचा अर्थ काय असतो, याबाबत तिने व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकतीच सईने 'अमुक तमुक' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला प्रेमातील बदलणाऱ्या अपेक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. वयानुसार प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का, यावर तिने उत्तर दिले.
यावर बोलताना सई म्हणाली, "मला असं वाटतं की, मी जर कोणाच्या प्रेमात असेन तर मी त्याच्या अनुपस्थितीत काय करते, यावरून माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे कळतं."
एखादी आवडती व्यक्ती सोबत नसतानाही तिची आठवण येणे, हीदेखील प्रेमाची भावना असल्याचे तिने सांगितले.
याबाबत उदाहरण देताना ती म्हणाली की, एखाद्या खास ठिकाणी गेल्यानंतरही ती व्यक्ती आपल्यासोबत असल्याची भावना मनात असते.
स्वतःचे वेगळेपण जपतानाच जोडीदारालाही त्याची स्पेस देणे महत्त्वाचे असल्याचे सईने स्पष्ट केले. "पण, त्या व्यक्तीच्या अनुपस्थीतीत आपण काय करतो हे सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे," असेही ती म्हणाली.