

सई मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.

‘ Go green or Go back !’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय.

हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसतच आहे मात्र तिची हेअर स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.