
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर हे कायमच त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाने सैफ अली खान याला डेट करण्यास सुरूवात केली.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केले. नुकताच आता दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करताना सैफ अली खान दिसला.

सैफ अली खान याला विचारण्यात आले की, लाॅकडाऊनच्या काळात तू कधी करीना कपूर हिचा हेअर कट केला का? यावर सैफ अली खान याने मोठे विधान केले.

सैफ अली खान म्हणाला की, मी कधीच तसे केले नाही आणि मी तसे केले असते तर करीनाने माझा जीव नक्कीच घेतला असता. मी तिचा हेअर कट करण्याचा विचार देखील करू शकत नसल्याचे सैफ म्हणाला.

लाॅकडाऊनच्या काळात लोक काही महिने आपल्या घरातच अडकून पडले होते. कोरोनाच्या काळात पार्लर वगैरे सर्वकाही बंद होते.