
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील बांद्रा येथे राहत्या घरी मध्यरात्री चाकून हल्ला झाल्याची घटना घडली होती. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची माहिती मिळतेय. सध्या सैफ अली खान लीलावती रुग्णालयात उपचार झाले. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सैफची सुरक्षाही वाढवली तसेच त्याच्या घरातही बरेच बदल करण्यात आले.

अभिनेता सैफ अली खानला नवाब म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं घरही तसच आहे. पतोडी पॅलेस तर सर्वांना माहितच आहे.पण त्याचं बांद्र्यातील घरही कुठल्या महालापेक्षा कमी नाहीये. सैफ अली खानच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर तर घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सैफ आणि त्याची पत्नी करीना आणि दोन मुलांसह मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या त्यांच्या आलिशान घरात राहतात.

जानेवारी 2021 मध्ये करीना आणि सैफ बांद्र्यातील सतगुरु शरण इमारतीत राहायला गेले. त्यांच्या घराची किंमत ही 50 ते 80 कोटींदरम्यान असल्याचं म्हटलं जातं. या इमारतीतील वरील चारही फ्लोअरवरील चारही माळे हे सैफचं घर आहे. त्याच्या सर्व घरांला मोठ्या मोठ्या बाल्कनी आहेत. तसेच घरातही अनेक अँटिक फर्निचर आहेत. सैफच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

घराच्या अनेक फोटोंमध्ये मोठमोठे नक्षीकाम असणारे गालिचे, जुनं फर्निचर, पुस्तकांची वेगळी खोली आणि त्यात असणारी शेकडो पुस्तकं असा एकंदर माहोलच सैफ-करीनाच्या घरात पाहायला मिळतो. त्यांच्या घरातील बाल्कनी कित्येकदा सैफ-करीना आणि त्यांच्या मुलांच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही पाहायला मिळाली आहे.

सैफ आणि करीनाच्या मुंबईतील या घरामध्ये अनेक पारंपरिक गोष्टींना मॉडर्न लूक देत त्या माध्यमातून घराची सजावट करण्यात आली आहे. त्यांच्या घरातील फर्निचरही अगदी एन्टीक पद्धतीचं पाहायला मिळतं. हाऊस पार्टी असो किंवा मग एखादा सण किंवा घरातील कोणा सदस्याचा वाढदिवस, सैफ आणि करीनाच्या या घरात अनेकदा पार्टीचं आयोजन केलं जातं. आणि त्यावेळसही त्यांच्या घरातील फोटो पाहायला मिळतात.

तसेच बऱ्याच फोटोंमध्ये त्यांच्या घरातील किचन एरिआही पाहायला मिळतो. जिथे सैफ किंवा करीना काहीतरी पदार्थ बनवत असताना दिसतात. तसेच गार्डन, स्विमिंग पूल, लायब्ररी, आलिशान लिव्हिंग रुम. या सगळ्या गोष्टी मॉर्डन असल्या तरी त्याला कुठेतरी मॉर्डन टचही देण्यात आला आहे. सैफच्या या आलिशान घराची चर्चा बी टाऊनमध्ये कायमच पाहायला मिळते