
सोमवारी सुद्धा या चित्रपटाने भरपूर कमाई केली. पहिल्या दिवशी 21 कोटी छापणाऱ्या या चित्रपटाने सोमवारी 22 कोटी कमावले. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने आतापर्यंत 105.75 कोटीची कमाई केली आहे. अहानचा चित्रपट पाहून इमोशन झालेल्या अभिनेत्री श्रुति चौहानची चर्चा आहे. अहान पांडेची ती रूमर्ड गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. ही कोण मुलगी आहे, जी I Love You म्हणाली?.

श्रुति चौहानने लिहिलय की, ''अहानने आयुष्यभर हेच स्वप्न पाहिलेलं. या क्षणासाठी त्याने सर्वकाही कुर्बान केलं. हे त्याच्यासाठी जो डिजर्व करतो. हा स्टेज तुझा आहे, अहान पांडे. आय लव्ह यू. मला तुझा अभिमान आहे. मी रडतेय, ओरडतेय. या जगाला फायनली कळलं तू काय करु शकतोस"

जयपुरची राहणारी श्रुति चौहान आणिअहान पांडे इन्स्टाग्रामवर परस्परांना फॉलो करतात. आता स्टार किड्सही त्यांना फॉलो करु लागलेत. ती एक मॉडल असून तिने चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलय. काही काळापूर्वी तिला जुबिन नौटियालच्या म्यूजिक व्हिडिओ ‘हद से’ मध्ये पाहण्यात आल होतं.

श्रुति चौहान आणि अहान पांडेने रिलेशनशिपबद्दल कुठलीही ऑफिशियल घोषणा केलेली नाही. एक पोस्ट नंतर दोघांच नाव जोडलं जातय. श्रुती चौहान 28 वर्षांची आहे. चित्रपटांशिवाय थिएटर सुद्धा करते. सोबतच जाहीरात, मॅगजीन शूट, लाइव्ह होस्टिंग आणि सोशल मीडिया कॅम्पेनचा भाग असते.

श्रुति चौहान हॉटस्टारची वेब सीरीज Karm Yuddh मध्ये सुद्धा दिसली होती. फिल्म आणि ओटीटी शिवाय सोशल मीडियावर सुद्धा ती एक्टिव असते. जितकी ती स्टायलिश आहे, तितकीच ती सुंदर आणि ग्लॅमरस आहे. याआधी सुद्धा ती अहान पांडेसोबत पार्टी करताना दिसलेली.