
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा स्वॅगच वेगळा आहे. अनेकजण त्याच्यासारखं बनण्याचा खूप प्रयत्न करतात. पण प्रत्येकालाच सलमानची स्टाइल कॉपी करायला जमत नाही. सलमानचा बॉडीगार्ड शेरा मात्र याबाबतीत खास आहे. त्याचीही स्टाइल आणि अंदाज सलमानपेक्षा काही कमी नाही.

सोमवारी रात्री खान कुटुंबाकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सलमानचे वडील सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत शेरा त्याच्या मुलासोबत पोहोचला होता.

सलीम खान आणि सुशीला यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण खान कुटुंब एकत्र आलं होतं. सर्वांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. या सर्वांत शेराने विशेष लक्ष वेधलं होतं. शेराने मुलगा अबीर सिंहसोबत पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

यावेळी शेरा हुबेहूब सलमान खानच्या स्टाइलमध्ये दिसून आला. शेराचा मुलगा अबीरनेही फोटोसाठी पोझ दिले. शेराला इतका मोठा मुलगा आहे असं वाटत नसल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. यावेळी शेराने हिरव्या रंगाची पँट आणि त्यावर बेज रंगाचा शर्ट घातला होता.

शेराचा मुलगा पांढऱ्या रंगाची ट्राऊजर आणि ब्लॅक स्वेटशर्टमध्ये दिसून आला होता. अबीरचाही लूक आणि पर्सनॅलिटी एखाद्या अभिनेत्यासारखीच होती.