
प्रसिद्ध रियॅलिटी शो बिग बॉस हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. या शोचा होस्ट सलमान खानची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. सलमान खाने स्पर्धकांची ज्या प्रकारे शाळा घेतो ते पाहणे प्रेक्षकांना आवडते. सलमानचे स्पर्धकांना समजावणे, त्यांना रागावणे आणि त्यांना आरसा दाखवण्याचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडतो.

सलमान खान गेल्या १५ वर्षांपासून बिग बॉस (Bigg Boss) होस्ट करत आहेत. त्याने चौथ्या सीझनपासून हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली होती आणि ओटीटीच्या दुसऱ्या सीझनचेही त्यानेच होस्टिंग केले होते. तो फक्त वीकेंड का वारमध्ये दिसला होता, पण दोन दिवसांतच सगळी लाइमलाइट खेचून घ्यायचा. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसचा होस्ट म्हणून राज्य करणारा सलमान या कामासाठी खूप मोठी फी आकारतो.

सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेते आणि होस्टपैकी एक मानला जातो. जेव्हा जेव्हा बिग बॉस सुरू होते, तेव्हा सर्वत्र त्याच्या फीविषयी चर्चा सुरू होते. यावेळीही काहीसे तसेच आहे. असे सांगितले जात आहे की, यावेळी अभिनेत्याने मागील सीझनच्या तुलनेत कमी फी घेतली आहे.

असे सांगितले जात आहे की, मागील सीझनमध्ये सलमान खानने २०० कोटी रुपये फी घेतली होती, पण या सीझनमध्ये त्याने त्याची फी कमी केली आहे. ताज्या अहवालानुसार, सलमान खान या सीझनसाठी प्रत्येक वीकेंड का वारसाठी १० कोटी रुपये आकारत आहेत.

एका अहवालानुसार, १९व्या सीझनमध्ये अभिनेता फक्त १५ एपिसोड्स होस्ट करणार आहे. यानुसार त्याची फी सुमारे १५० कोटी रुपये असेल. असे म्हटले जाते की, १८व्या सीझनमध्ये सलमानने २५० कोटी आणि १७व्या सीझनमध्ये २०० कोटी रुपये आकारले होते. सतत फ्लॉप ठरत असलेल्या सिनेमांमुळे सलमानने फी कमी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.