लता मंगेशकरांच्या 34 वर्षे जुन्या गाण्याने कमालच केली; 4 मिनिटे 24 सेकंदांमध्ये तब्बल 40 वेगवेगळ्या…
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातील एका गाण्याची आजही चर्चा होते. सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात तब्बल 40 हिंदी चित्रपटांची नावे गुंफण्यात आली आहेत. गाण्याचे शब्द, संगीत आणि खास अंदाज यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.
1 / 5

‘कभी तू छलिया लगता है’ हे या गाण्याचे नाव आहे. गाण्यातील मजेशीर शब्दरचना आणि चित्रपटांच्या नावांचा वापर हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे.
2 / 5
या गाण्याला लता मंगेशकर आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी आवाज दिला आहे. रामलक्ष्मण यांचे संगीत आणि रविंद्र रावल यांचे शब्द गाण्याला वेगळी रंगत देतात.
3 / 5
या गाण्यात सलमान खान आणि रवीना टंडन यांची जोडी पाहायला मिळते. त्यांचा रोमँटिक अंदाज आणि गाण्यातील मस्ती प्रेक्षकांना आवडली.
4 / 5
गाण्याच्या बोलांमध्ये जुन्या हिंदी चित्रपटांची तब्बल 40 नावे समाविष्ट आहेत. गाण्याचा सहज प्रवाह असल्यामुळे ही नावे ओळखणे रंजक ठरते.
5 / 5
पत्थर के फूल’ हा चित्रपट 22 फेब्रुवारी 1991 रोजी प्रदर्शित झाला होता. अनंत बालानी दिग्दर्शित या चित्रपटाने त्या काळात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आजही या चित्रपटाली गाणी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us