
सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला.

सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सलमान खान याने सोशल मीडियावर शेअर केलीये. विशेष म्हणजे सलमान खान याने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान याच्या खाद्यांवर शेराने हात टाकलाय.

सलमान खान याच्या पोस्टवर उत्तर देताना शेरा याने लिहिले की, धन्यवाद, मालिक तुम्ही मला दिलेल्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी...28 वर्षांपासून सलमान खान याच्या सुरक्षेचे सर्व काम हा शेरा हाच बघतो.

शेरा आणि सलमान खान एखाद्या मित्रासारखे राहतात. सलमान खान आणि शेरा यांच्यामध्ये जबरदस्त असे बॉन्डिंग हे बघायला मिळते. शेरा हा कायमच सलमान खान याच्यासोबत असतो.

सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याच्या सुरक्षेची सर्व काळजी शेरा याच्याकडेच असते.