
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या प्रीमिअरचं आयोजन केलं होतं. या ग्रँड स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या सर्वांत अभिनेता सलमान खानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण सलमानने अजब डिझाइनची पँट घातली होती.

'हिरामंडी' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या सलमानचा लूक सगळ्यांत हटके होता. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि त्याखाली ड्रॅगन बॉल झे़ड प्रिंटची पँट घातली होती. त्याच्या पँटवर जे डिझाइन्स होते, ते सर्व ॲनिम कॅरेक्टर्स होते.

त्याच्या या लूकवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कार्टून नेटवर्क', असं एकाने म्हटलंय. तर 'ही जीन्स नव्हे तर कार्टून हाऊस आहे', असं दुसऱ्याने लिहिलं आहे. सलमान खान कधीपासून ॲनिम फॅन झाला, असाही सवाल अनेकांनी केला आहे.

याआधी सलमान अशाच चित्रविचित्र डिझाइनच्या पँटमध्ये दिसला होता. मुंबई एअरपोर्टवरील त्याचा असाच एक लूक चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या पँटवर त्याच्याच चेहऱ्याची पेंटिंग होती. त्यामुळे हल्ली सलमानचे कपडे कोण डिझाइन करतंय, याविषयी चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.

भन्साळींच्या सीरिजच्या स्क्रिनिंगला सलमानची उपस्थिती पाहिल्यानंतर अनेकांनी दोघांना पुन्हा एकत्र काम करण्याची विनंती केली. सलमानने 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी सलमानसोबत काम केलं होतं.