
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड अखेर मंगळवारी यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आले.

शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संजय राठोड आपल्या पत्नीसोबत घरातून बाहेर पडले.

शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राठोड यांच्यासोबत 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे.

राठोड हे यवतमाळ येथून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. हे अंतर यवतमाळ यांच्या घरापासून 80 किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना दीड ते दोन तास पोहरादेवीत पोहोचायला लागणार आहेत. राठोड हे 80 किलोमीटर प्रवास करून जात असून ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.

संजय राठोड सहुकुटुंब पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते. आता ते आज पोहरादेवी येथे कोणती मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राठोड यांच्यासोबत 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे.