‘पंचायत’चा विक्रम मोडला, IMDb वर नंबर 1 ठरली ही धमाकेदार वेब सीरिज; प्रत्येक एपिसोड मनोरंजनाने परिपूर्ण

पंचायत, एस्पिरेंट्स, कोटा फॅक्ट्री, गुल्लक यांसारख्या दमदार वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या TVF ने या सीरिजची निर्मिती केली आहे. आयएमडीबीच्या यादीत या सीरिजने आता 'पंचायत'ला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.

| Updated on: May 15, 2026 | 9:20 AM
1 / 5
'द व्हायरल फीवर'ने (TVF) अस्सल, भावनिक आणि लोकांच्या आयुष्याशी मिळत्याजुळत्या कथा सादर करून स्वत:ला भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्रॉडक्शन हाऊसपैकी एक म्हणून ओळख मिळवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टीव्हीएफने विविध वेब सीरिजमध्ये मध्यमवर्गीय जीवनाचं प्रामाणिक चित्रण करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5
या वेब सीरिजमधील पात्रं आणि प्रसंग लगेचच प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. नुकताच प्रदर्शित झालेला 'सपने व्हर्सेस एव्हरीवन' या सीरिजचा दुसार सिझनसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या सीरिजने आता IMDb च्या लोकप्रिय भातीय टीव्ही शोजच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.

3 / 5
विशेष म्हणजे 'सपने व्हर्सेस एव्हरीवन'ने IMDb च्या रेटिंगमध्ये प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय 'पंचायत' या वेब सीरिजलाही मागे टाकलं आहे. 'सपने व्हर्सेस एव्हरीवन'ने IMDbच्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

4 / 5
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'यावेळी ड्रीमर्सने (स्वप्न पाहणाऱ्यांनी) खऱ्या अर्थाने मनं जिंकली आहेत. सपने व्हर्सेस एव्हरीवन पाहिल्याबद्दल, शेअर केल्याबद्दल आणि त्यातील प्रत्येक भावना अनुभवल्याबद्दल धन्यवाद. हे प्रेम आमच्यासाठी सर्वस्व आहे.'

5 / 5
'सपने व्हर्सेस एव्हरीवन' या वेब सीरिजने IMDb च्या टॉप 250 टीव्ही शोजच्या यादीत स्थान मिळवल्यामुळे 'द व्हायरल फीवर'ने जागतिक कंटेंट क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. IMDb च्या टॉप 250 टीव्ही शोजच्या यादीत स्थान मिळवलेल्या टीव्हीएफच्या इतर सीरिजमध्ये TVF पिचर्स (9.1 रेटिंग), पंचायत (9.0 रेटिंग), गुल्लक (9.1 रेटिंग), कोटा फॅक्ट्री (9.0 रेटिंग), एस्पिरंट्स (9.1 रेटिंग), ये मेरी फॅमिली (8.9 रेटिंग) यांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us