सारा अली खान हॉलिवूड स्टारसोबत गुपचूप अडकली लग्नबंधनात? फोटोंमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि हॉलिवूड स्टार हेन्री कॅविल यांच्या एकत्र फोटोंनी जगभरात मोठी खळबळ उडवली आहे. हे दोघे ब्रिटनमधील प्रसिद्ध रॉयल एस्कॉट कार्यक्रमात भेटले आणि त्यांची ही भेट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सारा आणि हेन्नी यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत.

| Updated on: Jun 19, 2026 | 4:32 PM
1 / 5
सारा अली खान आणि हेन्री कॅविल यांनी लंडनमध्ये आयोजित प्रतिष्ठित रॉयल एस्कॉट घोड्यांच्या शर्यतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी, ते दोघांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोज दिली. हा फोटो लॉंगिन्स ब्रँडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून आणि सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली.

सारा अली खान आणि हेन्री कॅविल यांनी लंडनमध्ये आयोजित प्रतिष्ठित रॉयल एस्कॉट घोड्यांच्या शर्यतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी, ते दोघांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोज दिली. हा फोटो लॉंगिन्स ब्रँडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून आणि सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली.

2 / 5

दोघांच्या ड्रेसिंगमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सारा अली खानने पांढरा फॉर्मल स्कर्ट सूट आणि डोक्यावर पांढरी नेट हॅट घातलेली दिसत आहे, तर हेन्री कॅविल क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये सूट आणि हॅट घातलेला दिसत आहे. दोघेही ख्रिश्चन वधू-वरांसारखे दिसत असल्याने, दोघांनी गुपचूप लग्न केलं का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

3 / 5

पण दोघांचं लग्न झालं नसून, फक्त अफवा पसरल्या आहेत. फोटोबद्दल सांगायचं झालं तर, ब्रिटनमधील रॉयल एस्कॉट या क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी ड्रेस ठरलेला आहे. उपस्थित राहणाऱ्या पुरुष आणि महिला दोघांनाही पारंपरिक पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे.

4 / 5

ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे, राणी कॅमिला आणि प्रिन्स विल्यम यांच्यासह संपूर्ण राजघराण्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, सार आणिल हेन्नी यांच्या जोडीला नेटकरी 'राजकुमारी आणि सुपरमॅन' असं म्हणत असून, ही जोडी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

5 / 5

सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये सारा हिच्या आयुष्यात खास व्यक्ती कोणीच नाही... असं देखील सांगितलं जात आहे. तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us