
सारा अली खाननं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिने सेलिब्रेटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला आहे.

साराचे हे फोटो मनीष मल्होत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे.

साराने घातलेला लेहेंगा मनीष मल्होत्रा यांच्या 'नूरानियत' कलेक्शनमधील आहे.

सारा अली खान या लेहेंगामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या लेहेंगासोबतच सारानं तिच्या हातात एक अंगठी कॅरी केली आहे. सोबतच तिने कमीतकमी मेकअप केला आहे आणि आपले केस मोकळे ठेवले आहेत.

साराच्या या फोटोशूटसाठीही ऐतिहासिकदृष्ट्या त्या स्थानाची निवड केली गेली आहे, जी साराचा लूक आणखीन सुंदर दाखवण्याचं काम करत आहे.

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच तिने अक्षय कुमार आणि धनुष यांच्याबरोबर तिच्या 'अतरंगी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.