Sara Tendulakr-Sania Chandok : तेंडुलकरांची लेक आणि सुनेचे Unseen Photo, नणंद-वहिनी नव्हे सख्ख्या मैत्रिणीच !

सारा तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्यातील सुंदर नातं आता अधिक दृढ झालं आहे. अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर बालपणीच्या मैत्रिणी आता नणंद-वहिनी बनल्या आहेत. लग्नात साराने सानियाला दिलेला आधार आणि त्यांच्यातील सहजता सर्वांनाच भावली. त्यांच्या जुन्या फोटोंमधूनही हे खास बाँडिंग दिसून येते, जे त्यांची घट्ट मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर दर्शवते.

| Updated on: Mar 10, 2026 | 2:36 PM
1 / 6
Sara Tendulkar Saaniya Chandhok Bonding : क्रिकेटचा देव अशी ख्याति असलेल्या सचिन तेंडुलकरच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. गेल्याच आठवड्यात ( 5 मार्च) सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह झाला. मुंबईत शानदार सोहळ्यात दोघेही लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटर्सही आले होते. अर्जुन आणि सानियाच्या लग्नात, सारा तेंडुलकरचा लूक आणि तिचा डान्स खूप चर्चेत होता. लाल रंगाच्या वधू वस्त्रात सानिया सुंदर दिसत होती तर गुलाबी रंगाच्या साडीत सारानेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (All Photos : Instagram)

2 / 6

लग्नादरम्यान सानिया आणि सारा यांच्यातील नातं, त्यांच बॉडिंग पाहून सगळेच भारावले.खरंतर सानिया ही साराची मैत्रीण, आणि ती तिची वहिनी देखील बनली. साराने सानियाला खूप सांभाळून घेतलं, पापाराझींसमोर कधीच अस्वस्थ वाटू दिले नाही. सारा सतत सानियाचा हात धरून होती. त्या नणंद वहिनी कमी आणि बहीणीच जास्त वाटत होत्या.

3 / 6

रिपोर्ट्सनुसार, सानिया चांडोक आणि सारा तेंडुलकर बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि आता त्या एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. म्हणूनच सानिया आणि सारा एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असतात. लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओमध्येही त्या एकत्र मजेत दिसल्या. .

4 / 6

लग्नाच्या फोटोंव्यतिरिक्तही, सानिया आणि साराचे काही जुने फोटो देखील व्हायरल होत आहेत, ज्यातून त्यांचं बाँडिंग स्पष्टपणे दिसतं. या फोटोमध्ये, दोघीही बाल्कनीजवळ उभ्या आहेत, त्यांनी क्युट सॅटिन नाईट सूट घातले आहेत. सानियाच्या डोक्यावर बार्बी बँड आहे आणि सारा बाजूला उभी आहे. हे फोटो व्हायरल झाले होते.

5 / 6

तर हा फोटो थोडा जुना आहे,कोणाच्या तरी लग्नात काढलेला दिसतोय. एका लग्न समारंभातील या फोटोमध्ये सारा गडद गुलाबी साडीमध्ये, हातात फोन घेऊन सेल्फी घेताना दिसते, तर सानिया तिच्या मागे निळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीत उभी आहे. फोटोमध्ये दोन्ही मैत्रिणी सुंदर दिसत आहेत; सानियाने मांगटीका तर साराने मोठ्या कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

6 / 6

पारंपारिक ड्रेसप्रमाणेच दोघी मॉडर्न लूकमध्येही तितक्याच सुंदर दिसतात. या फोटोमध्ये सारा तेंडुलकरने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि सानिया तिच्या शेजारी काळ्या रंगाचा जॅकेट, सोनेरी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट घालून उभी आहे. दोघीही लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंना खूप लाईक्स येतात, कमेंट्सही मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us