
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

तिच्या एका फोटोवर लोक लाखोंनी कमेंट्स करतात. दरम्यान, सारा तेंडुलकरने नुकताच तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या खास मैत्रिणींना सोबत घेऊन तिने हा वाढदिवस साजरा केला आहे. सेलिब्रेशननंतर तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

समोर आलेल्या या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर फारच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. खरं म्हणजे 12 ऑक्टोबर रोजीच तिचा बर्थडे होता. मात्र आता तिने या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने तिच्या 28 व्या वाढदिवसाच्या केकचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिची होणारी वहिनी दिसत आहे.

सारा तेंडुलकरचा भाऊ अर्जुन तेंडुलकरचा सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा झालेला आहे. सानिया सारा तेंडुलकरची बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळेच तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सानियादेखील उपस्थित होती.

सारा तेंडुलकरने सानियासोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. लोक सारा तेंडुलकरला शुभेच्छा देत आहेत.