
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये सुटी घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली होती. आता साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

इंस्टाग्रामवरील या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर विम्बल्डनच्या प्रसिद्ध कोर्टजवळ दिसत आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय असल्याचे दिसत आहेत. स्टायलिश हिरवा ड्रेस आणि सनग्लासेसमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

या फोटोंना सारा तेंडुलकरने खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, 'माझं पहिलं विम्बल्डन.' याचाच अर्थ तिने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेचा लाईव्ह सामना पाहिला. सारा अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ यांच्यातील पुरूष एकेरीचा उपांत्य सामना पाहण्यासाठी गेली होती. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर युवराज सिंगच्या फाउंडेशन UVCAN च्या चॅरिटी डिनरमध्ये देखील दिसली होती. या डिनरमध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि संपूर्ण संघ उपस्थित होता. त्यावेळी सारा तेंडुलकर आणि गिलचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

शुभमन गिलचे नाव अनेकदा सारा तेंडुलकरशी जोडले गेले आहे. मात्र शुभमन आणि सारा यांनी यावर कधीही भाष्य केलेलं नाही. सारा सध्या युरोपमध्ये फिरत आहे. काही दिवसांपूर्वी ती स्वित्झर्लंडलाही गेली होती. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)