Sachin Tendulkar: सचिनच्या साधेपणानं जिंकली सर्वाचं मनं, सारानं शेअर केलेल्या Photo मधून पाहायला मिळालं क्रिकेटच्या देवाचं ‘ते’ रुप

Sachin Tendulkar Photo: सारा तेंडुलकरने दिवाळी ऑफिस पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात सचिन तेंडुलकरांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 06, 2026 | 12:28 PM
1 / 5
सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील देव असले तरी ते इतके साधे, सरळे आहेत की ते नेहमीच त्यांच्या कृतीतून दिसून येते. सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील देव असले तरी ते इतके साधे, सरळे आहेत की ते नेहमीच त्यांच्या कृतीतून दिसून येते. सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5

सारा तेंडुलकरने तिच्या ऑफिसमधील दिवाळी पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, तिचे संपूर्ण कुटुंब या पार्टीला उपस्थित होते. साराने ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये सर्वांसाठी पार्टी आयोजित केली होती. फोटोमध्ये कुटुंब एका टेबलावर बसून जेवताना दिसत आहे.

3 / 5

या फोटोमध्ये सचिन तेंडुलकरने पिवळा कुर्ता घातलेला दिसत आहे. एका फोटोमध्ये सचिन ऑफिसमध्ये रांगोळी काढताना दिसत आहे. त्याने लाल रंगाची फुलांची रांगोळी काढली आहे. यावरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं की सचिन किती साधा आहे.

4 / 5

सचिन इतका मोठा क्रिकेटर असूनही खाली बसून त्यानं रांगोळी काढली. यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. लोकांनी कमेंट करत सचिनचे भरभरुन कौतुक केले आहे.

5 / 5

साराने तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिचे वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत दिसत आहे. तिची वहिनी सानियादेखील तिच्या मागे उभी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us