भाजपाचा मी मोठा समर्थक; सीजेपीचा नेता सौरभ दास यांनी सांगितला थेट किस्साच
Saurav das : सीजेपी नेता सौरभ दास यांनी एका किस्सा सांगितला आहे. त्यांची एका भाजप समर्थकांशी भेट झाली. या भेटीतील संवाद सौरभ दास यांनी सांगितला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास यांच्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या काही मतदारांमध्ये संभ्रम झाल्याचा दावा दास यांनी केला आहे. सौरभ दास यांनी एका पॉडकास्टदरम्यान हा दावा केला आहे.
सौरभ दास हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये 'स्कूल ठीक करो' अभियानाच्या दौऱ्यावर आहेत. या अभियानाअंतर्गत अनेक शाळांना भेटी देत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने अद्याप कोणत्याही नवीन आंदोलनाची घोषणा केलेली नाही.
भाजप मतदार तुम्हाला पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न सौरभ दास यांना विचारण्यात आला. द एकेएस पॉडकास्टमध्ये सौरभ दास यांनी म्हटलं की, आम्ही पाहत आहोत की, आम्ही रस्त्याने चालतो. तर लोक येऊन भेटायला येतात. लोक कौतुक करतात. त्यानंतर सांगतात की, मी भाजप आधी समर्थक होता. परंतु आता नाही'.
सीजेपीच्या नेत्याने सांगितलं की, माझी भाजप समर्थकाशी भेट झाली. मी दिवाळीच्या पार्टीत होतो. माझा मित्र गिफ्ट घेत होता. त्याचवेळी तिकडे एक माणूस उभा होता. त्यानंतर जवळ आल्यावर म्हणाला की, तुम्ही सीजेपीवाले आहात ना...तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे'. त्यानंतर त्यांनी फोटो काढला.
भाजप समर्थक व्यक्ती म्हणाला की, मी आधी भाजप समर्थक होतो. परंतु आता या लोकांचं अति झालं आहे'. दास यांनी पुढे सांगितलं की, आता लोक भाजपच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. मी जिथे जातो, तिथे पाहायला मिळत आहे'.