
गायिका सावनी रविंद्र नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

आपल्या सुमधुर आवाजाने सावनी ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करते.

सावनीने मराठीसह हिंदी आणि दक्षिणात्य भाषांमध्येही गाणी गायली आहेत. ती गोड गळयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा असते.

आता सावनीनं मस्त साध्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करत आहेत.

निळ्या रंगाच्या या कॉटन ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.