
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सायली संजीव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

सध्या हे दोघं ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

शंतनू आणि शर्वरीची ही जोडी सध्या एका सुंदर वळणावर येऊन ठेपली आहे.

नुकतंच पार पडलेल्या कलर्स मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात या दोघांनी हटके अंदाजात हजेरी लावली होती.

आता सुयशनं हे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.