घरातल्या खिचडीने घेतला दुसऱ्या चिमुकलीचा बळी, संभाजीनगरातील त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिळ्या खिचडीतून ही विषबाधा झाली होती. या घटनेत सात वर्षीय आयुष नारायण थोटे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याची बहिण गायत्री हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नातून विषबाधेची धक्कादायक घटना घडली. घरातील खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला.
ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिळ्या खिचडीतून ही विषबाधा झाली होती. या घटनेत सात वर्षीय आयुष नारायण थोटे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याची बहिण गायत्री हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नारायण थोटे त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सिल्लोडला नेत असताना आयुषचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. अन्नविषबाधेच्या या घटनेत एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शिळे अन्न खाऊ नये, असा सल्ला दिला जातोय.