
स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य होणार आहे.

अनेकदा स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्ड करताना तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, अशी घोषणा होते. यामुळे गोपनीय संभाषण रेकॉर्ड करणं शक्य होत नाही.

अनेकदा महत्त्वाच्या संभाषणांची नोंद ठेवण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग उपयुक्त ठरते. पण या घोषणेमुळे अडचणी निर्माण होतात. मात्र, आता एका सोप्या ट्रीकने तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य होणार आहे.

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये एक असा पर्याय आहे, ज्यावर क्लिक करून तुम्हाला ही घोषणा बंद करुन कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर कॉन्टॅक्ट्स अॅप (Contacts App) उघडा. आता उजव्या बाजूला तुम्हाला तीन बिंदूंचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर, तुम्हाला सेटिंग्ज पर्यायामध्ये जा आणि त्यानंतर कॉल सेटिंग्ज (Call Settings) पर्याय निवडा.

येथे तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग सेटिंग्ज (Call Recording Settings) साठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

त्यापैकी तुम्हाला 'डिस्क्लेमरऐवजी प्ले ऑडिओ टोन' (Play Audio Tone instead of Disclaimer) नावाचा पर्याय शोधावा लागेल. त्यासमोर दिसणाऱ्या टॉगलवर क्लिक करा आणि तो बंद (Off) करा.

या बदलानंतर, जेव्हा तुम्ही कॉल रेकॉर्ड कराल तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूंनी एक 'बीप'चा आवाज ऐकू येईल. हा आवाज कशासाठी आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही आणि तुम्ही तुमचे संभाषण सहजपणे रेकॉर्ड करू शकाल.

स्मार्टफोनमधील या लपलेल्या फीचरमुळे आता अनेक वापरकर्त्यांना गोपनीयतेची चिंता न करता महत्त्वाचे कॉल रेकॉर्ड करणे शक्य होणार आहे.