
यंदा पावसाळ्यात मुंबईच नाही तर चिपळूणपासून अगदी चीनपर्यंत पावसाने थैमान घातलंय.

कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतींमध्ये देखील पाणी घुसतंय.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये पावसाने दाणादाण उडवली. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही.

चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तुफान पावसामुळे रस्त्यावरील वाहने वाहून जात आहेत.

चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत.

चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने संपूर्ण शहर पाण्यात गेलं आहे.

मागच्या 48 तासात खेड आणि चिपळूणच्या भागात 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

कोयनाच्या खालच्या धरणाचं पाणी सोडवं लागल्याने चिपळूण शहर बुडालं. शहरात तुफान पावसामुळे घरं पाण्याखाली गेलं आहेत.

चिपळूणमधील पूरस्थिती

युरोपसह चीनमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये तर मागील 1 वर्षांनंतर इतका पाऊस झाल्याचं सांगितलं जातंय. या पावसाने चीनमधील मोठ्या प्रमाणात भाग पाण्याखाली गेलाय. तेथे पावसाने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय.

चीनमध्ये रेल्वेत पाणी घुसलंय. अनेक ठिकाणी कार पाण्यात तरंगताना दिसत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी अक्षरशः सैन्याला बोलावण्याची वेळ आलीय. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

लोकांना बेघर व्हावं लागतंय. त्यामुळे जागतिक तापमान वाढीचाही मुद्दा चर्चेत आहे. निसर्गाचं संतुलन बिघडल्यानंच हा प्रकोप पाहायला मिळतोय, असंही मत व्यक्त केलं जातंय. इतकंच नाही तर अजूनही पर्यावरण संवर्धानावर काम केलं नाही तर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.