7 दमदार थ्रिलर सीरिज, तिसऱ्याची कथा लोकप्रिय तर 7 नंबरचा ‘मस्ट वॉच’

ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे काही दमदार वेब सीरिज आहेत, ज्यांची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यातील सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका त्याला आणि मनोरंजक बनवतात. अशा सात सीरिज कोणत्या आहेत, ते पहा..

Updated on: Oct 09, 2025 | 11:49 AM
1 / 7
मिर्झापूर- ही एक लोकप्रिय क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजचा पहिला सिझन 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याची कहाणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर नावाच्या काल्पनिक शहरावर आधारित आहे. आतापर्यंत या सीरिजचे तीन सिझन प्रदर्शित झाले आहेत.

2 / 7
पाताल लोक- या सीरिजमध्ये समाजातील तीन स्तरांचं चित्रण करण्यात आलं आहे. स्वर्ग लोक (श्रीमंत), पृथ्वी लोक (मध्यम वर्ग) आणि पाताळ लोक (अंडरवर्ल्ड/ गुन्हेगारी विश्व). यामध्ये जयदीप अहवालतने पोलीस निरीक्षक हाथीराम चौधरीची मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजचे दोन्ही सिझन्स सुपरहिट ठरले आहेत.

3 / 7
द फॅमिली मॅन- मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन राज आणि डीके या जोडीने केलंय. यामध्ये शारीब हाश्मी, प्रियामणी आणि शरद केळकर यांच्याही भूमिका आहेत. या सीरिजचेही दोन्ही सिझन्स तुफान गाजले.

4 / 7
ब्रीद- ही एक थरारक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज आहे. याचेही दोन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गंभीर आजारी असलेल्या मुलाच्या वडिलांची कहाणी पहिल्या सिझनमध्ये दाखवण्यात आली. तर दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन खलनायकी भूमिकेत आहे. दोन्ही सिझन्सची कथा मनाला चटका लावणारी आहे.

5 / 7
दहाड- अत्यंत प्रामाणिक आणि निर्भिड पोलीस अधिकारी अंजली भाटीची (सोनाक्षी सिन्हा) कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये विजय वर्माने खलनायकाची भूमिका साकारली आहे. यातील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

6 / 7
फर्जी- या वेब सीरिजमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. एका प्रतिभावान स्केच आर्टिस्टभोवती याची कथा फिरते, जो त्याच्या आजोबांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनावट नोटा छापण्याचा निर्णय घेतो. शाहिदसोबतच त्यामध्ये भुवन अरोरा, विजय सेतुपती आणि के. के. मेननसारखे कलाकार आहेत.

7 / 7
द लास्ट अव्हर: 2021 मध्ये प्रदर्शित झालेली ही सुपरनॅच्युरल मायथोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. यामध्ये संजय कपूरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये प्रत्येक वळणावर भरभरून सस्पेन्स आहे. एकदा तुम्ही ही सीरिज बघायला सुरुवात केली, तर शेवटपर्यंत तुम्ही फोन खाली ठेवू शकणार नाही.