
शाहरुख खान याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर राज करताना दिसतायंत. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट तूफान कामगिरी करतोय.

शाहरुख खान याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याने यावेळी त्याच्या पर्सनल लाईफबद्दल हा खुलासा केलाय.

शाहरुख खान म्हणाला की, मला रात्री झोप फार कमी येते. मी रात्री जास्त वेळ तर फोनवरच बिझी असतो. मी रात्री दोन वाजता रोज फोनवर बोलत असतो.

माझे रात्रीचे फोन पार्टनर देखील ठरलेले आहेत. मी रात्री 2 ते 7 फोनवरच बिझी असतो. मी सर्वात अगोदर रात्री 2 वाजता माझी मुलगी सुहाना हिला बोलतो. ती विदेशात शिक्षणासाठी आहे. 2 पर्यंत तिचे देखील काम होतात.

सुहानानंतर मी माझा मुलगा आर्यन खान याला फोनवर बोलतो. आम्ही रोज रात्री काही तास फोनवर बोलतोच. आर्यन देखील विदेशात असतो. शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.