
शाहरूख खान याची लेक सुहाना खान सध्या तूफान चर्चेत आहे. सुहान खान ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. सुहाना सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे.

सुहाना खान हिने नुकताच खुलासा केला की, ती आलिया भट्ट हिला रोल माॅडल समजते. इतकेच नाही तर यासोबतच तिने मोठे भाष्य केले.

सुहाना खान म्हणाली की, आपण एकदा घातलेले कपडे हे परत घालू शकतो. नेहमीच नवीन कपड्यांची अजिबातच गरज नाहीये.

काही दिवसांपूर्वीच लग्नामध्ये घातलेली साडी आलिया भट्ट हिने एका पुरस्कार सोहळ्यामध्ये घातली होती. ज्यानंतर अनेकांनी तिचे काैतुक देखील केले.

सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर हे एकाच चित्रपटात काम करणार आहेत. सुहाना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.