
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही देखील यंदा बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या अगोदर सुहाना खान ही प्रचंड चर्चेत दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना सुहाना दिसत आहे.

नुकताच सुहाना खान हिने एक खास फोटो शेअर केला आहे. सुहाना खान हिचा लूक पाहून चाहते चांगलेच फिदा झाल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे लाल रंगाच्या साडीवर सुहाना ही दिसत आहे.

खास पार्टीचे आयोजन सुहाना खान हिने घरी केले होते. यावेळी सुहाना खान हिचे चुलत बहीण भाऊ या पार्टीला हजर होते. आता याच पार्टीतील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये सुहाना खान ही लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत असून जबरदस्त लूक तिचा दिसत आहे. आता सुहाना खान हिच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.