
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते. सुहाना खान हिचा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्यास तयार आहे.

सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्याच्या अगोदरच कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. बाॅलिवूडच्या काही अभिनेत्रींना सुहाना संपत्तीमध्ये आरामात मागे टाकते.

सुहाना खान हिचे न्यूयार्कमध्ये एक अत्यंत आलिशान असे घर आहे. फक्त न्यूयार्कच नाही तर सुहाना खान हिची काही प्राॅपर्टी ही आलिबागला देखील आहे.

इतकेच नाही तर सुहाना खान हिच्याकडे अत्यंत आलिशान आणि कोट्यवधी रूपये किंमत असलेल्या गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे.

रिपोर्टनुसार सुहाना खान ही जाहिरातींमधूनही तगडी कमाई करते. आता सुहाना खान हिचा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.