Shah Rukh Khan Family : शाहरुख खान याच्या कुटुंबात कोण कोण ?; या व्यक्तीबाबत माहीत आहे काय ?

बॉलिवूडचा बादशाह, किंग खान, शाहरूख खान याचा आज 58 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याचा एक फॅमिली फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. त्याच्या कुटुंबातील या व्यक्तीबाबत तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Nov 02, 2023 | 12:50 PM
1 / 5
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. किंग खानच्या चित्रपटांसोबतच त्याची लाइफस्टाइल आणि त्याचे कौटुंबिक जीवन, या विषयांची त्याचे चाहते नेहमीच चर्चा करत असतात. त्यामुळेच फक्त शाहरुखच नव्हे तर त्याचं अख्खं कुटुंब नेहमी लाइमलाइटमध्ये आणि चर्चेत असतं. सोशल मीडियावर पुन्हा एकदा या खान कुटुंबाची चर्चा सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे, शाहरुखची पत्नी गौरी, हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. ( Photos : Instagram)

2 / 5
 गौरी खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खान, गौरी आणि त्यांची तिन्ही मुलं - सुहाना, आर्यन आणि अबराम,  मस्त स्टाईलमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये त्या सर्वांनीच ब्लॅक अँड व्हाईट कपडे घातले आहेत.

3 / 5
एवढंच नव्हे तर शाहरुख खानच्या फॅन पेजवर त्याचे काही फॅमिली फोटोही शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. शाहरुखचे चाहते फोटोंवर कमेंट करून प्रेम व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जगातील नंबर 1 फॅमिली'. आणखी एका यूजरने लिहिले की, 'पठाण परिवार... त्यांची गोष्ट वेगळी..'

4 / 5
प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. सोशल मीडियावरही ती खूप ॲक्टिव्ह असते.

5 / 5
 शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी त्याचे 'पठाण' आणि 'जवान' हे दोन्ही चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला. आता तो 'डंकी' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.