शनिदेवाची आली स्वारी; या लोकांची आता चांदी, मालामाल होणार या राशी
Shanidev Zodiac Signs : शनिदेवाची स्वारी आली आहे, आता या राशीच्या कष्टाला, मेहनतीला याला फळ येणार आहे. शनिची आता वक्री चाल आता अनेकांचे भाग्य उजळणार आहे. काही राशींची परीक्षा घेतली जाईल. तर काहींना घबाड, अनपेक्षित धक्के बसतील.

शनिदेवाची स्वारी आता 12 राशींना काही ना काही देऊन जाणार आहे. तुम्हाला जगाची खरी ओळख आता झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळले. तर काहींचे डोळे उघडतील. या काळात काही राशींना शुभ फळं मिळतील. तर काही राशींसाठी हा काळ संयमाचा, परीक्षा घेणारा ठरेल. ही कसोटी तुम्ही उत्तमरित्या पास झाला तर तु्म्ही शनिदेवाचे प्रिय व्हाल. यंदा 13 जुलै रोजी शनिदेव मीन राशीत वक्री होत आहे. येत्या 28 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत ही वक्री चाल कायम असेल. 138 दिवसांत या राशींना खजिना मिळणार आहे. त्यांचा उत्साह, आनंद दुप्पट होणार आहे. त्यांना दान पावल्याचा अनुभव घेता येईल. लॉटरी लागल्यागत हे दिवसमान असतील.
वृषभ – शनिचा हा फेरा वृषभ राशीसाठी चांगला आहे. या राशीच्या 11 व्या भावावर त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. लाभ, इच्छापूर्ती, मान मरतब देणार असेल. यापूर्वीच्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. नवीन नोकरी, व्यावसायिक संधी मिळेल.
डिस्क्लेमर : ही ज्योतिष, पंचांग आणि धार्मिक ग्रंथाआधारील माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या.