AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers : शेतीची वाटणी एकदम फ्री! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा

Registration Fee Waived : शेतजमि‍नींच्या वाटप पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील लाखो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.

Farmers : शेतीची वाटणी एकदम फ्री! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा
शेतकऱ्यांचा मोठा फायदा Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 26, 2025 | 9:00 AM
Share

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शेत जमिनींच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती. आता त्याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. शेतजमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी 30 हजार रुपयांच्या घरात शुल्क आकारले जाते. हे शुल्क आता माफ झाले आहे. शेतकर्‍यांना कागदपत्रांच्या खर्चा व्यतिरिक्त सरकारी शुल्काची झळ बसणार नाही. त्यामुळे जमिनी वाटपाची रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लागतील.

एका महिन्यापूर्वीच शिक्कामोर्तब

राज्य मंत्रिमंडळाने जमीन वाटप दस्तनोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय या मे महिन्याच्या अखेरीस घेतला होता. महसूल विभागाने हा निर्णय घेतला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची माहिती दिली होती. विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने तात्काळ मान्यता दिली होती. यामुळे शेती वाटप पत्रावरील दस्त नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही हे स्पष्ट झाले होते. राज्यात कृषक आणि अकृषक मिळकतीसाठी नोंदणी शुल्क सारखेच आहे. एकूण मूल्याच्या 1 टक्क्यांपर्यंत साधारणतः 30 हजारांपर्यंत हे शुल्क आकारण्यात येते. मुंद्राक शुल्क 100 रुपये असले तरी नोंदणी शुल्क अधिक होते. आता हे शुल्क माफ करण्यात आले आहे. याविषयीची अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली आहे. या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील लाखो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.

या निर्णयाचे फायदे काय?

वाटप पत्र सहज नोंदणी होईल

शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल

नोंदणींची संख्या वाढेल

जमिनीचे वाद कमी होतील

सरकारच्या तिजोरीवर भार

या निर्णयामुळे सरकारच्या महसूलात दरवर्षी 35 ते 40 कोटींची घट येण्याची शक्यता आहे. सरकारच्या तिजोरीत आवक घटेल. तर दुसरीकडे शेतकर्‍यांची शेती वाटपावरून होणारी भांडणं आणि रखडलेली नोंदणी या जाचातून सुटका होईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करावी लागते. त्यावेळी वाटप दस्तासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. मुद्रांक शुल्काचा भार अत्यल्प आहे. पण नोंदणी शुल्क 30 हजारांच्या घरात होते. आता हे शुल्क माफ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा