Yugendra Pawar Engagement : युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, पहिले फोटो समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांचा तनिष्का कुलकर्णी यांच्याशी मुंबईत साखरपुडा झाला. पवार कुटुंब एकत्र आले. सोशल मीडियावर या समारंभाचे फोटो व्हायरल झाले.

| Updated on: Aug 03, 2025 | 2:46 PM
1 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथे साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले होते.

2 / 5
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

3 / 5
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णीसोबतच्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या सोहळ्यात तनिष्काने सुंदर गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती, तर युगेंद्र पवार यांनी त्याच रंगाचा सदरा आणि जॅकेट परिधान केले होते.

4 / 5
या आनंदाच्या क्षणी, पवार कुटुंबात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचाही ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा झाला होता.

5 / 5
आता युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला आहे. या दोन शुभ कार्यामुळे कुटुंबातील आनंद द्विगुणीत झाला आहे. तसेच युगेंद्र पवार यांना अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छाही दिल्या जात आहेत.