Stock Market: वर्षाअखेर कंडोम कंपनीचा शेअर हिंदोळ्यावर, एका घोषणेने स्टॉक सुसाट, गुंतवणूकदार मालामाल

Cupid share: या कंडोम कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर आहे. हा शेअर हिंदोळ्यावर असण्यामागे एक मोठे कारण आहे. एका घोषणेमुळे या शेअरमध्ये कमालीची उलाढाल दिसत आहे. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

| Updated on: Dec 30, 2025 | 5:13 PM
1 / 6
कंडोम कंपनी क्युपिड लिमिटेडचा शेअरमध्ये आज जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर बीएसईवर 3.7 टक्के वधारला. हा शेअर 504.85 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. ही या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी आहे. एका घोषणेने हा स्टॉक सुसाट पळाला आहे.

2 / 6
कंपनीने बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरब सरकारने एक नवीन FMCG युनिट सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे क्युपिड कंपनीचा शेअर 500 रुपयांच्यावर ट्रेड करत होता. या शेअरमध्ये 2.77 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर त्याचवेळी बीएसईमध्ये घसरण दिसत होती.

3 / 6
क्युपिड कंपनीचे मार्केट कॅप या घडामोडींमुळे आता जवळपास 13,521.35 कोटी रुपयांवर पोहचले आहे. क्युपिडचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 504.85 रुपयांवर तर निच्चांकी कामगिरी 50 रुपये अशी आहे. या एका वर्षात या कंपनीने जोरदार परतावा दिला आहे. आता कंपनीचे उत्पादन युनिट देशबाहेर पण सुरु होणार आहे.

4 / 6
आखातातील देशासह मध्य-पूर्वेत कंडोमचा पुरवठा अधिक सुरळीत करता यावा यासाठी कंपनीने सौदी अरबमध्ये कंडोम उत्पादनासाठी नवीन युनिट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सौदी सरकारने त्याला मंजूरी दिली आहे. जागतिक बाजारात यामुळे कंपनीचा वाटा वाढणार आहे. तर इकडे शेअरवर सुद्धा त्याचा परिणाम दिसेल.

5 / 6
क्युपिड कंपनी ही 1993 साली स्थापित झाली आहे. ही कंपनी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी कंडोम, आयव्हीडी किट्स, परफ्युम, हेअर ऑईल, बॉडी ऑईल आणि पेट्रोलियम जेली आणि इतर अनेक उत्पादनं तयार करते. 2024 मध्ये कंपनीने महाराष्ट्रातील पलावा येथे नवीन कारखाना सुरु केला आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.