Share Market: महत्त्वाची अपडेट, येत्या शुक्रवारी शेअर बाजारात नाही होणार ट्रेडिंग, कारण काय?
Stock Market Friday Closed: येत्या शुक्रवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही. शुक्रवार असला तरी या दिवशी शेअर बाजार बंद असेल. इक्विटी, डेरिवेटिव्स आणि एसएलबी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही.

तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर पुढील आठवड्यात केवळ चार दिवसच बाजारात व्यापारी सत्र असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारीच ट्रेडिंग होईल. तर शुक्रवारी व्यापारी सत्र बंद असेल. त्यामागे काय कारण आहे ?

शुक्रवारी 1 मे रोजी भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस असतो. या दिवशी शेअर बाजार दरवर्षी बंद असतो. या दिवशी BSE आणि NSE ट्रेडिंग बंद असतात. या दिवशी इक्विटी, डेरेवेटिव्स आणि एसएलबी सेगमेंटमधील सर्व व्यवहार बंद असतात.

या दिवशी या सर्व सेगमेंटसह मल्टी कमोडिटी एक्सचेंज सकाळी 9 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत व्यापारी सत्र बंद असेल. पण संध्याकाळचे सत्र सुरू असेल. यासोबत शेअर बाजार वर्षभरात कधी कधी बंद असले याची संपूर्ण यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या आठवड्यात शेअर बाजाराचा मूड स्विंग होताना दिसला. काही सत्रात जबरदस्त कमाई झाली. तर इतर सत्रात मोठे नुकसान झाले. काही शेअरने कमाल दाखवली. स्मॉल कॅप, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांना या चढउताराचा फटका बसला आहे.

पुढील आठवड्यात पश्चिम आशियातील भू राजकीय परिस्थिती, काही कंपन्यांचे चौथ्या तिमाहीतील निकाल आणि कच्चा तेलाच्या किंमती शेअर बाजाराची दिशा ठरवतील. विश्लेषकानुसार, होर्मुज समुद्रधुनीतील तणावाचा शेअर बाजारावर परिणाम दिसेल.

अमेरिका-इराण तणावाचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर दिसेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी, गुंतवणूक करताना घाई न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. जर मध्य-पूर्वेतील युद्ध थांबले तर बाजाराला दिलासा मिळेल.