Share Market: 29.59 रूपयांचा डिव्हिडंड देणार कंपनी, माहिती समोर येताच शेअर खरेदीसाठी एकच गर्दी

Share Market Dividend: इंजिनिअरिंग कंपनी गुंतवणूकदारांना 29.59 रूपयांचा डिव्हिडंड देणार आहे. ही माहिती समोर येताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी एकच धूम केली आहे. काय आहे अपडेट?

| Updated on: Feb 24, 2026 | 4:45 PM
1 / 6
Share Market Dividend: इंजिनिअर कंपनी एबीबी इंडियाच्या (ABB India Ltd) शेअरने मोठा धुमाकूळ घातला. कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल आला आहे. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीच्या तुलनेत ऑर्डर बुकमध्ये  52 टक्क्यांची वाढ झाली. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला.

Share Market Dividend: इंजिनिअर कंपनी एबीबी इंडियाच्या (ABB India Ltd) शेअरने मोठा धुमाकूळ घातला. कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल आला आहे. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीच्या तुलनेत ऑर्डर बुकमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला.

2 / 6

आता अंतरिम लाभांश देण्याची घोषणा झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची मोठी उसळी आली. गेल्या व्यापारी सत्रात ABB इंडिया लिमिटेडची किंमत 6,118 रुपयांच्या उच्चांकावर पोहचल्या. गेल्यावेळी हा भाव 5715 रुपये होता. त्यापेक्षा आता शेअरमध्ये 7 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.

3 / 6

ABB इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये तीन वर्षात 22 टक्क्यांचा कंपाऊंडेट रिटर्न दिला. तर गेल्या पाच वर्षांचा विचार करता कंपनीने 30 टक्क्यांचा परतावा दिला. ABB इंडिया लिमिटेड एक लार्ज कॅप इलेक्ट्रिकल स्टॉक आहे. ही कंपनी इंडस्ट्रीयल, डेटा सेंटर आणि ट्रान्सपोर्टशन विभागात इलेक्ट्रिफिकेशन, मोशन, प्रोसेस ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सॉल्यूशन्ससाठी आघाडीवर आहे.

4 / 6

आर्थिक वर्ष 2025-26 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा ऑपरेशनल महसूल वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी वधारला. कंपनीचा महसूल 3365 कोटीहून 3557 कोटींपर्यंत पोहचला. तर गेल्या तिमाहीत 3311 कोटींपेक्षा या कंपनीने 7 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या नफ्यात 18 टक्क्यांची घसरण झाली

5 / 6

तिमाही निकालानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 29.59 रुपयांचा अंतिरम लाभांश जाहीर केला आहे. लाभांश, या शेअरच्या फेस व्हॅल्यूच्या 1480 टक्के आहे. या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 2 मे 2026 ही आहे. बाजारात सध्या मोठा उलटफेर सुरू आहे.

6 / 6

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us