
शीजान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. शीजान खान हा खतरो के खिलाडी 13 मध्ये धमाका करताना दिसला.

शीजान खान हा बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता यावर शीजान खान याने मोठा खुलासा केला.

शीजान खान हा म्हणाला की, मला वाटत नाही की, मी आता बिग बॉस 17 मध्ये सहभागी होईल. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. मी बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार नाही.

शीजान खान हा तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर जोरदार चर्चेत आला. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले.

इतकेच नाही तर तुनिशाच्या प्रकरणात शीजान खान याच्यावर जेलमध्ये राहण्याची वेळही आली. खतरो के खिलाडीमध्ये जबरदस्त स्टंट करताना शीजान दिसला.