11 वर्षांचा मुलगा तडफडत होता, आम्ही त्याच्या निधनासाठी प्रर्थाना… प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

अभिनेता शेखर सुमन यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंग नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. 1995 मध्ये त्यांनी आपला 11 वर्षांचा मुलगा आयुष याला गमावलं. मुलाच्या आजारपणातील आठवणी सांगताना ते भावुक झाले.

| Updated on: Oct 14, 2026 | 1:58 PM
1 / 5
आयुषला एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस (EMF) हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाला होता. त्या काळात या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र त्यांने वयाच्या ११ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

आयुषला एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस (EMF) हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाला होता. त्या काळात या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र त्यांने वयाच्या ११ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

2 / 5

आयुषची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. मुलाचा त्रास पाहून आई अलका यांनाही मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी डॉक्टरांकडे मुलाच्या वेदना संपाव्यात म्हणून मृत्यूची विनंती केली होती.

3 / 5

शेखर सुमन यांनी मुलाच्या शेवटच्या क्षणांची आठवण ती तरफड आणि मुलाला गमावण्याचं दुःख सांगितलं. आयुषने वडिलांचा हात धरून म्हटलं, “पापा, मुझे जाने मत दो। मुझे बचा लो।” हे शब्द आजही त्यांच्या मनात कायम आहेत.

4 / 5

शेखर यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणी आयुष संस्कृत श्लोक म्हणू लागला. त्याने आजूबाजूला सोनेरी प्रकाश दिसत असल्याचेही सांगितले. हा प्रसंग त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता.

5 / 5

आयुषने अखेरच्या क्षणी कुटुंबीयांप्रती आपले प्रेम व्यक्त केले. त्याने घरातील सदस्यांसह ड्रायव्हरवरला देखील आठवण केले. आणि त्यांच्याशीदेखील आपुलकीने बोलला. असं शेखर सुमन यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us