
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. आपल्या फिटनेसकडे शिल्पा अधिक लक्ष देते.

नुकताच शिल्पा शेट्टी हिने चांगल्या वैवाहिक जीवनाबद्दल मोठे भाष्य केले आहे. शिल्पा शेट्टी ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

शिल्पा शेट्टी म्हणाली की, माझे आणि राज कुंद्राचे विचार मध्यमवर्गींसारखे आहेत. आम्ही कायमच आमच्या मुलांसोबत जेवण करतो. मध्यमवर्गी लोकांसारखे आम्ही आयुष्य जगतो.

हेच चांगल्या वैवाहिक आयुष्याचा मंत्र आहे, असे मला वाटते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टी हिने मोठी खंत व्यक्त केली.

शिल्पा शेट्टी म्हणाली की, माझे नाव कधीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 मध्ये घेतले गेले नाही. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत.