
बॉलिवूडमधील सर्वात आकर्षक आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. वयाच्यी ४० शी ओलांडल्यानंतर ती अतिशय हॉट आणि सुंदर दिसते. तिचे सौंदर्य एका तरुण अभिनेत्रीला देखील लाजवेल. पण एकदा शिल्पाने एका अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते.

शिल्पाने वयाच्या 16व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर 1993 मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती, पण तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले.

शिल्पाने अक्षय कुमारसोबत 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या वेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. पण २००० साली त्यांचा ब्रेकअप झाला. नंतर अक्षयने २००१मध्ये थेट ट्विंकल खन्नाशी लग्न केले.

ब्रेकअपनंतर शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयबाबात प्रश्न विचारताच धक्कादायक खुलासा केला होता. 'अक्षयने केवळ माझा वापर केला होता. आम्ही दोघेही रिलेशनशीपमध्ये होतो. पण त्याच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले' असे शिल्पा म्हणाली. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले होते.

पुढे ती म्हणाली, 'तो एकमेव पुरुष आहे ज्याला मला आतापर्यंत प्रचंड राग येतो. कारण त्याने मला खूप वाईट प्रकारे फसवले.'