तब्बल 24 वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, इमारतीत शिरण्यापूर्वी केलेल्या एका कृतीने जिंकले मन, पाहा Photos

आज शिवसेना भवनात सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळावर गंभीर चर्चा केली.

| Updated on: Oct 19, 2025 | 4:03 PM
1 / 6
शिवेसना भवनात आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेनंतर हे नेते एकत्रितपणे निवडणूक आयोगाला निवेदन देण्याची शक्यता आहे. या बैठकीला ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस यांसह विविध विरोधी पक्ष उपस्थित आहेत. या सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला हजेरी लावतील.

2 / 6
या पत्रकार परिषदेसाठी सध्या शिवसेना भवनात जयंत पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे हे दाखल झाले आहेत. आणखी काही महत्वाचे नेते लवकरच दाखल होण्याची अपेक्षा आहे.या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना भवनात सर्व नेत्यांची बैठक सुरु आहे. ही बैठक आजच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी घेतली जात आहे.

3 / 6
आता या बैठकीच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनी मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. या प्रवेशामुळे त मोठे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 6
यावेळी बाळा नांदगावकर यांनी शिवसेना भवनाखाली असलेल्या अनेक शिवसैनिकांशी संवाद साधला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शिवसैनिकांकडून आपुलकीने चौकशी केली.

5 / 6
यानंतर बाळा नांदगावकर यांनी शिवसेना भवनात जाण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेल्या पहिल्या पायरीला हाताने स्पर्श करत नमस्कार केला. यानंतर ते आत गेले.

6 / 6
सध्या शिवसेना भवनातील पाचव्या मजल्यावर ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत मतदार याद्यांच्या घोळाबद्दल चर्चा सुरु आहे. निवडणुकीपूर्वी या घोळावर ठोस भूमिका घेण्यावर भर दिला जात आहे.