
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाने आशूला प्रपोज केल्याचं संपदा सर्वांना सांगते. आशू शिवाची आवडती मिठाई घेऊन वस्तीत जातो. पण दिव्या मुद्दाम मिठाईचा बॉक्स खाली पाडते.

आशुने शिवाच्या आवडीची मिठाई आणली म्हणून आजी खुश आहे. शिवा आणि आशू घरी येताच घरातील सर्वजण आशूला उत्तर कधी देणार असं विचारताच आशू लाजून निघून जातो.

आशूच्या मनातही शिवाबद्दल काहीतरी आहे म्हणून आशुने शिवाच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातलाय, त्याच रंगाची फुले आणलेत, शिवाच स्केच भिंतीवर लावलाय, संपूर्ण खोली नीटनेटकी ठेवली आहे. हे सगळं पाहून शिवा भारावून जाते.

आशू सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामं करतो. दुसरीकडे दिव्या गावी पोहोचताच तिला चंदनच्या खऱ्या परिस्थितीबद्दल समजतं. तेव्हा तिचा राग अनावर होतो.

सकाळी किचनमधे आशू शिवाला मदत करत असल्याचं पाहून सीताईला हनिमूनला गेल्यावर दोघांमध्ये काहीतरी घडलं असल्याचा संशय येतो. शिवाचा वाढदिवस जवळ येत आहे. तेव्हा आशू तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करायचं ठरवतो.

आशू मध्यरात्री सायकलवर चहा विकणाऱ्या माणसाला घेऊन येतो. शिवामध्ये झालेले छोटे छोटे बदल आशूला दिसतात. शिवा घरातील सर्वांना बोलावून कीर्ती आणि सुहासला माफ केलं पाहिजे हे समजावून सांगते. सीताई आणि कीर्ती शिवाच्या छोट्या केसांबद्दल बोलतात, तेव्हा आशू वेगळ्याच पद्धतीने शिवाच्या केसात गजरा माळतो.