शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण, रायगड ते जिंजी… राज्यातील 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत

शिवप्रेमींमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. महाराजांच्या कोणत्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे ते जाणून घ्या

| Updated on: Jul 12, 2025 | 2:18 PM
1 / 12
रायगड किल्ला : स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला.  महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे.

2 / 12
राजगड किल्ला : राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला.

3 / 12
प्रतापगड किल्ला : येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि  अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे. सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली.

4 / 12
पन्हाळा किल्ला : महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिादानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला.

5 / 12
शिवनेरी किल्ला : महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे.

6 / 12
लोहगड किल्ला : पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत. सीता गुहा, विंचूकाटा, लक्ष्मी कोठी.. अशा अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर आहेत.

7 / 12
साल्हेर किल्ला : एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून 1567 मी. म्हणजेच 5141 फूट उंचीवर आहे.

8 / 12
सिंधुदुर्ग किल्ला : हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.

9 / 12
सुवर्णदुर्ग किल्ला : रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ, हर्णे बंदरात, समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला. या किल्ल्यामुळे मराठा आरमाराला समुद्रात चांगली सुरक्षितता मिळाली.

10 / 12
विजयदुर्ग किल्ला : मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं.

11 / 12
खांदेरी किल्ला : खांदेरी ही किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बवण्यसाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली.

12 / 12
जिंजी किल्ला : हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे.