मित्रासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तुकाराम मुंढे यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार, कर्मचाऱ्याने ताटात..

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हाती घेतल्यापासून मोठे धाडसत्र सुरू आहे. भेसळयुक्तांना त्यांनी दणका दिला. तुकाराम मुंढे यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

| Updated on: Aug 20, 2026 | 10:32 AM
1 / 5
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात घेतल्यापासून देशभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत.यादरम्यानच तुकाराम मुंढे यांचे जोरदार काैतुक होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून काम सुरू केल्यानंतर आपल्यासोबत हॉटेलमध्ये काय घडले हे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

2 / 5
एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, मला माझ्या मित्राने हॉटेलमध्ये जेवणाचे निमंत्रण दिले होते. मी त्याला अगोदर नाहीच म्हटले होते, जेवतानाही माझी नजर नियमभंगाकडे असेल हे मी त्याला सांगितले होते.

3 / 5
मी हॉटेलमध्ये जेवणास गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की, तिथे अन्न सुरक्षा परवाना लावला नाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही. माझ्या मित्राने पनीर मागवले. ते अस्सल पनीर नव्हते, याबाबत मी हॉटेल कर्मचाऱ्याला सांगितले.

4 / 5
मी माझ्या मित्राला पनीर खाऊ दिले नाही. त्यावेळी मी तात्काळ कोणतेही कारवाई त्या हॉटेलवर केली नाही. हॉटेल व्यवस्थापनाकडे गंभीर बाबी मांडल्या. 24 तासांची मुदत त्यांना दिली.

5 / 5
मी 24 तासानंतर तिथे तपासणीसाठी आमचे पथक पाठवले. मात्र, त्यावेळीही सुधारणा झाली नव्हती, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने भेसळ खोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us