हेमा मालिनी ते श्रीदेवीसोबत काम, पण 30 वर्षात या अभिनेत्रीच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली नाही आला

बॉलिवूडमध्ये आज अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या बोल्ड सीन सहज करतात. अंग प्रदर्शन करण्यात त्यांना काही चुकीच वाटत नाही. पण एककाळ असाही होता की, ज्यावेळी अभिनेत्री खूप काळजी घ्यायच्या. बॉलिवूडमध्ये अशीही एक अभिनेत्री होती, जिच्या डोक्यावरुन 30 वर्षात पदर कधीच ढळला नाही.

| Updated on: Aug 16, 2025 | 3:19 PM
1 / 5
चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत नाव कमावलं, पण नेहमी आपल्या अटींवर चालले. त्यापैकीच एक अभिनेत्री होती लिला मिश्रा. ज्यांनी शोले चित्रपटात बसंतीच्या मौसीचा रोल प्ले केलेला.

2 / 5
'शोले'  चित्रपट 1975 साली रिलीज झाला. 50 वर्ष या चित्रपटाला पूर्ण झालीयत. लिला मिश्रा यांच्याबद्दल बोलायच झाल्यास त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. पण कधीही त्यांच्या डोक्यावरचा पदर ढळला नाही.

3 / 5
वयाच्या 18 व्या वर्षी लिला मिश्रा यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्या आधी त्यांना दोन मुलं झाली. त्यांच्या चित्रपटात काम करण्याला आधी कुटुंबियांनी विरोध केला. पण नंतर नवऱ्यामुळे सर्वांनी होकार दिला.

4 / 5
लिला मिश्रा यांचं वयाच्या 12 व्या वर्षी राम प्रसाद मिश्रासोबत लग्न झालेलं. राम यांनी अनेक सायलेंट चित्रपटात कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून काम केलेलं. रामच्या मामाने लिलाला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिलेला.

5 / 5
राम आणि लिला यांनी एकत्र एकाच चित्रपटात काम केलं. सती सुलोचना या चित्रपटाच नाव होतं. या चित्रपटासाठी लिलाला 500 रुपये फी मिळालेली. रामला 150 रुपये मिळालेले. रामपेक्षा लिला मिश्रा यांनी पडदा गाजवला.